मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर राज्यभरातून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपली भमिका स्पष्ट केली आहे.
“अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी आहे” असे देवेंद्र फडणवीस सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.
दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ज्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले आहेत. अ
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.