हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आपल्याला इंटरनेटवर काहीही सर्च करायचे असेल तर आपण सर्वांत आधी Google वर जातो कारण येथे आपल्याला हवी असलेली माहिती अगदी सहजरित्या मिळते. मात्र गुगलवर काहीही सर्च करणे अंगलट येऊ शकेल. होय, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण गुगलवर बिनधास्तपणे सर्च करू शकत नाही. कारण असे करणे हा गुन्हा आहे. ज्यामुळे आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुगलवर चुकूनही सर्च करू नयेत हे जाणून घेउयात.
1) बॉम्ब कसा बनवायचा ?
जर आपण Google वर चुकूनही बॉम्ब कसा बनवावा हे सर्च केले तर अडचणीत सापडू. असा सर्च केल्याने आपण थेट सुरक्षा एजन्सीच्या रडारवर येऊ. ज्यानंतर आपल्यावर कायदेशीर कारवाई केली देखील होऊ शकेल.
2) चाइल्ड पॉर्नोग्राफी
चाइल्ड पॉर्नोग्राफी या शब्दाचा अर्थ असा आहे की लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक कंटेन्ट. असा कंटेन्ट देखील सर्च करणे आपल्याला खूप महागात पडू शकते. भारतात सरकारने याबाबत खूप कडक कायदा केला आहे, यामध्ये आपल्याला पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगात जावे लागू शकते. गुगलवर चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित काहीही सर्च करताना पकडले गेलात तर 5-7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकेल.
3) गर्भपाताबद्दल सर्च करणे
जर तुम्ही गुगलवर गर्भपाताशी संबंधित माहिती सर्च केली तर अडचणी येऊ शकाल, कारण भारत सरकारने यासाठी अनेक कठोर कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या मान्यतेनंतरच हे शक्य आहे, म्हणून पुढच्या वेळी असे काहीही सर्च करण्यापूर्वी जरा विचार करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.google.com
हे पण वाचा :
आज Google ओपन केल्यावर हे काय दिसतंय? जाणून घ्या
Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन
49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच…
अरे बापरे!! ‘या’ गावातील लोकं महिनोंमहिने झोपतात; काय आहे गुपित? जाणून घ्या…
अहो आश्चर्यम !! एकही नट-बोल्ट न वापरता बनवला आहे ‘हा’ ब्रीज