व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; ठाकरेंचा शेतकऱ्यांना आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. खचून जाऊ नका, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलं आहे.

औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचं मोठं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे थेट दहेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यावेळी साहेब आमची दिवाळी गोड करा असं म्हणत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडली. यानंतर ठाकरे शेतकऱ्यांना धीर देत काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे . सरकारला मदत मिळवून देण्यासाठी आपण भाग पाडू असं आश्वासन देत आधार दिला.

दरम्यान, राज्यातील सत्तांतरा नंतर प्रथमच उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद हा खरं तर शिवसेनेचा बाल्लेकिला मानला जातो परंतु शिवसेनेत जी काही बंडाळी झाली त्यामध्ये औरंगामधीलच जास्त आमदार शिंदे गटात गेलेलं आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आता राज्यातील सरकार कोसळल्या नंतर उद्धव ठाकरे प्रथमच औरंगाबादला गेले असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य आहे.