धनंजय मुंडे सारख्या वाघाला विधानसभेत पाठवा : अमोल कोल्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली सत्ताधाऱ्यांनी दिली . याअगोदरच भाजप पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले.हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले .

शिवस्वराज्य यात्रा ही परळीमध्ये आली असता अमोल कोल्हे यांनी सभेला संबोधित केले. गेल्या पाच वर्षात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता यांना विचारायची वेळ आली. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मझा? असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. महिला अत्याच्यार, बलात्कार अशा सगळ्याच घटनेतील आकड्यात वाढ होत आहे. यावरून सरकारचे अपयश दिसते.

तसेच ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे. मी गेल्या २४ वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. मी कुठे कमी पडत नसेल तर माझ्यात काय कमी आहे याचा विचार करा. हात जोडून कळकळीची विनंती करतोय, ही माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे. २४ वर्ष सेवा केली त्याचा आशीर्वाद देण्याची ही निवडणूक आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Leave a Comment