हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे एक अवघड काम आहे. अनेक लोकं यामध्ये चुका करतात. ज्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून नोटिस येतात. आज आपण अशा पाच चुकांबाबत जाणून घेणार आहोत, ज्या न केल्याने आपण फक्त नोटीसच टाळू शकणार नाही तर जास्त टॅक्स सूट देखील मिळवू शकू. हे लक्षात घ्या की, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
टॅक्स डिडक्शनचे क्रेडिट न घेणे- कधीकधी आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी रिफंड मिळतो. काही वेळा रिफंड ड्यू ऐवजी डिमांड नोटीस मिळते. याचे सामान्य कारण म्हणजे TDS कपातीसाठी योग्य क्रेडिट न मिळणे आहे. TaxBuddy. कॉमचे सुजित बांगर म्हणतात की,” जर आपण आपल्या पगारासह प्रोफेशनल रिसिप्ट दाखवल्या तर आपल्याला क्रेडिट नोटीस मिळणार नाही.
स्पेक्युलेटिव्ह उत्पन्न विरुद्ध रेग्युलर इनकम- जर तुम्हाला सट्टा व्यवहारातून तोटा झाला आणि नियमित ट्रेडिंग मधून नफा झाला, तर आपण हा तोटा आणि नफा रद्द करू शकत नाही. असे केल्याने आपल्याला नोटीस मिळेल.
बँक व्हॅलिडेशन- ITR रिफंड मध्ये उशीर होण्याचे तिसरे सर्वात सामान्य कारण म्हणजे बँक अकाउंट व्हॅलिडेशन करण्यास झालेला उशीर. आपले पॅन आणि आधार बँक खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करा जेणेकरून रिफंड लवकर मिळणे सोपे होईल.
फॉर्म 16 च्या पुढे टॅक्स वाचवता येत नाही – पगारदार व्यक्तींना असे वाटते की, फॉर्म 16 व्यतिरिक्त इतर कुठूनही टॅक्स वाचवता येत नाही. हे चुकीचे आहे. आपण दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी करतो ज्यावर टॅक्स सूट मिळवता येते. उदाहरणार्थ, मुलाच्या शैक्षणिक फी वर किंवा RTPCR चाचणीवर 5,000 रुपयांपर्यंतची टॅक्स सूट घेतली जाऊ शकते.
चुकीच्या ITR फॉर्मची निवड- ITR फॉर्मची चुकीची निवड देखील त्रासदायक ठरते. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे 1 पेक्षा जास्त मालमत्ता असेल तर आपण ITR-1 फॉर्म दाखल करू शकत नाही. त्यामुळे नेहमी योग्य ITIR फॉर्म निवडा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण, नवीन दर पहा
Shinzo Abe प्रमाणेच ‘या’ मोठ्या नेत्यांची देखील केली गेली हत्या !!!
Business Idea : या ‘मसालेदार’ व्यवसायाद्वारे कमवा लाखो रुपये !!!
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!
Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!