फळे खाताना करू नका ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच फळे खाण्याचा सल्ला देत असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यांची शरीराला भरपूर गरज असते. तसेच शरीराला मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्स फळांमधूनच मिळतात. याशिवाय त्यामधील पाण्यामुळे शरीर नेहमी हायट्रेट राहतं. परंतु चुकीच्या पद्धतीने फळे खाणे तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरू शकत. त्यामुळे कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने फळे खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये –

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अधिक पाणी पिण्याची आवश्यकता गरज नसते . फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील पीएच पातळी असंतुलित होऊ शकते तसेच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो.

कापल्यानंतर फळे धुवू नये-

फळे कापल्यानंतर कधीही धुवू नयेत. फळे कापल्यानंतर धुतले तर फळातील जीवनसत्त्वे आणि खनिजेही पाण्यात वाहून जातात. त्यामुळे फळातील पौष्टिक घटक हवे असतील तर ही चूक करू नका.

रात्री फळे खाऊ नये –

फळांचे सेवन दिवसभर करा. परंतु रात्रीचे फळे खाणे टाळा. रात्री फळे खाल्ल्यांनंतर तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन झोपेचा त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय रात्रीची फळे खाल्ल्याने ऍसिडिटीची समस्याही उदभवू शकते.

फळांची साल काढू नका-

फळे खात असताना त्याची साल काढू नका. सालीमध्ये शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि अँटीऍक्सीडेन्ट घटक असतात. उदाहरणार्थ , सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी असते.