मुंबईकरांसाठी खुशखबर!! बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ‘डबल डेकर इलेक्ट्रिक बस’

BEST ELECTRIC BUS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर आहे. आजपासून बेस्टच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सामील होणार असून मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे. आज 18 ऑगस्टला बसचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

ही बस भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस ठरणार आहे . आज 18 ऑगस्ट रोजी या बसेसचे उद्घाटन होणार आहे. मात्र उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या बसेसची झलक रस्त्यावर पाहायला मिळाली. या डबल डेकर बसची सेवा सामान्य मुंबईकरांसाठी पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. या बसचे डिझाईन अतिशय छान असून तुम्हाला लंडनमधील डबल डेकर बसची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

इलेक्ट्रिक गाडयांना चालना देण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये नवीन इलेक्ट्रिक बसेस चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बेस्टकडे सध्या 400 हून अधिक इलेक्ट्रिक बस आहेत . तसेच अजून 900 इलेक्ट्रिक बसेस विविध टप्प्यात पुरवण्याचे कंत्राट बेस्टने एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यापैकी 50 टक्के बसेस मार्च 2023 पर्यंत आणि उर्वरित 50 टक्के बसेस त्यानंतर येणे अपेक्षित आहे.