टीम हॅलो महाराष्ट्र | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी. त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारे त्रिपाठी हे मागील बऱ्याच काळापासून आजाराने त्रस्त होते. ते ६७ वर्षांचे होते. दिल्लीमधील खासगी रुग्णालयामध्ये त्रिपाठी यांनी अखेरचा श्वास घेतला.
उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे जन्मलेले त्रिपाठी हे डाव्या विचारसरणीचे राजकारणी होते आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगातही गेले होते. नंतर ते कॉंग्रेसमध्ये रुजू झाले आणि राजीव गांधींचे सल्लागार झाले.
नंतर ते शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राज्यसभेचे खासदार होते आणि ‘थिंक टँक’ या मासिकाचे संपादकही होते.