मुंबई प्रतिनिधी | अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याने शिवसेनेला ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हे हे राष्ट्रवादीकडून शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उद्याच ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश करण्याची शक्यता आहे.त्यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील हेही उपस्थित असणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीकडून शिवसेनेला हा मोठा धक्का असणार आहे.अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याशिवाय दोन माजी आमदारही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.२०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. अमोल कोल्हे हे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे शिरुरचे आहेत.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?