डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण; लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन पुढील काही महिने पर्यटकांसाठी बंद

गडचिरोली | डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 7 दिवस आमटे यांना ताप व खोकला आला होता. बुधवारी कोरोना टेस्ट केली असता त्यांची RTPCR निगेटीव्ह आली. ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूर ला चेक अप केले असता त्यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आला.

डॉ. आमटे यांचे सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमटे यांना तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात भरती होण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आज डाॅ आमटे नागपूर येथे भरती होणार आहत.

दरम्यान, गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना विषाणु परत राज्यात वाढतो आहे. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी असे डाॅ. अनिकेत आमटे यांनी सांगितले.

You might also like