हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने गुडीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. तसेच मास्कची सक्तीही मागे घेण्यात आले आहे. मात्र, मुंबईत नुकताच कोरोनाचा एक नवीन असा एक्सआर व्हेरिएंट आढळून आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मुंबई महापालिकेच्या वतीने जरी कोरोनाचा एक्सआर आणि कापी व्हेरियंट असल्याचे सांगितले जात असले तर याबाबत पुष्टी झालेली नाही. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही,” अशी माहिती डॉ. टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश रोपे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, “कोरोनाचा एक्सआर आणि कॉपी व्हेरियंट असल्याचे सांगितले जात आहे. परंतु याबाबत अद्यापही ठोस अशी पुष्टी झालेली नाही. या व्हेरियंटची एनआयबीकडे देखील टेस्टिंग करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या या नव्या व्हेरियंट बाबत दाहकता तसेच धोका किती हे अजून स्पष्ट झालेले नाही. कस्तुरबा रूग्णालय आणि एनआयबीकडून जिनोम सिक्वेंगिं रिपोर्टर सादर करण्यात येणार आहेत. परंतु लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे डॉ. टोपे यांनी सांगितले.