Tuesday, February 7, 2023

Krushna Election Result : रेठरे- शेणोली गटातून डॉ. सुरेश भोसले यांना 4 हजार 974 मतांची आघाडी

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या रेठरे- शेणोली गटातून दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या डॉ. सुरेश भोसले व बाजीराव निकम यांनी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत रेठरे- शेणोली गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 17 हजार 294 मतापैकी 16 हजार 767 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 527 मते अवैद्य ठरलेली आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल डॉ. सुरेश भोसले (रेठरे बु.) 10 हजार 49, बाजीराव दाजी निकम 9 हजार 202. संस्थापक पॅनेल अविनाश जगन्नाथ मोहिते (रेठरे बु) 5 हजार 75, अधिकराव जयवंत निकम (शेरे) 4 हजार 36. रयत पॅनेल डॉ इंद्रजीत यशवंतराव मोहिते (रेठरे बु) 2 हजार 371, बापूसो नानासो पाटील (रेठरे बु) 1 हजार 704 अशी मते असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.