विशेष प्रतिनिधी। भाजप-सेनेमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून शिवसेनेशी संपर्क साधण्याचे प्रयन्त केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा पेच मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत.वर्षा बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.
दरम्यान, युतीच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्रीपदावरून काही बोलणे झाले नव्हते असे विधान फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरून युतीत मुख्यमंत्रीपदारून ठिणगी पडली होती. सत्तेत समसामान वाट्याच्या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा होता असे शिवसेनेचं म्हणणे आहे. तेव्हा हे विधान मागे घेण्यासाठी आता भाजपा एक मसुदा तयार करत आहे. जेणेकरून शिवसेना सत्तास्थापनेसाठी तयार होईल. हा मसुदा कसा असेल यावर आता सर्व काही अवलंबून आहे.