Dragon Fruit महाग आहे म्हणून टाळू नका; याचे आरोग्यदायी फायदे पाहून थक्क व्हाल

Dragon Fruit
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आरोग्यासाठी (Dragon Fruit ) फळांचे सेवन करण्याचे सल्ले डॉक्टर देत असतात. फळांबाबत बोलायचं झाल्यास, केळी , सफरचंद, द्राक्षे, चिक्कू ही नाव आपल्यासमोर सहज येतात. परंतु गुलाबी रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. परदेशी फळ असल्याने ड्रॅगन फ्रुटची किंमत सामान्य फळांपेक्षा थोडी जास्त असते. परंतु याचे शरीराला होणारे फायदे पाहता तुम्हीही हे फळ खरेदी करायला काहीही हरकत नाही. चला आज आपण जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूटचे काही आरोग्यदायी फायदे….

1) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत-

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते. ड्रॅगन फ्रुटमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स सारखे घटक आढळतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

2) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत-

ड्रॅगन फ्रूटमुळे रोगप्रतिकार (Dragon Fruit ) शक्ती वाढू शकते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो.

Dragon Fruit

3) हृदय निरोगी ठेवण्यास मदत-

देशात अनेक लोकांना हृदय विकाराचा (Dragon Fruit ) धोका संभवतोय. अशावेळी ड्रॅगन फ्रूट हृदय सुरक्षित आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. या फळाच्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसिड असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

4) पचनक्रिया चांगली होते-

तुम्हाला ऍन पचवताना त्रास होत असेल(Dragon Fruit ) तर तुम्ही बिन्दास्त ड्रॅगन फ्रुट खा. ड्रॅगन फ्रुटमध्ये ऑलिगोसॅकराइड या रासायनिक संयुगाचे प्रीबायोटिक घटक असतात जे आतड्यात निरोगी जीवाणू तयार करण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया चांगली होते. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आतड्याची हालचाल होण्यास मदत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Dragon Fruit
Dragon Fruit

5) हाडे आणि दात मजबूत होतात- (Dragon Fruit )

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. ड्रॅगन फ्रुट मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने सांधे आणि दातदुखीची समस्या दूर होते.