Monday, February 6, 2023

खोकडपुरा भागात ड्रेनेज फुटल्याने रस्त्यावर साचले पाणी; ये-जा करण्यासाठी नागरिकांना अडचण

- Advertisement -

औरंगाबाद | शहरातील खोकडपुरा भागातील वार्ड क्रमांक 54 मध्ये आठ दिवसापासून ड्रेनेज फुटल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ड्रेनेज लाईन रिक्षास्टँड जवळच असल्याने ड्रेनेजचे पाणी रिक्षास्टँड जवळून वाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

हॅलो महाराष्ट्राची बोलतानी काही नागरिकांनी अडचणी मांडल्या. ते म्हणाली की, नगरसेवक रामेश्वर भादवे आमच्या कोणत्याही समस्यांकडे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार विनंती करून देखील आमच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. वार्ड अधिकारी देखील आमच्या वार्डकडे लक्ष देत नाहीत. आमच्या समस्या मांडव्या तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

एकीकडे महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात रस्ते, बांधकाम, पुल बांधत आहे. मात्र दुसरीकडे खोकडपुरा भागात ड्रेनेजच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ड्रेनेजच्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर कराव्या अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे.