हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत योजनेसाठी लागणारे पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत. मात्र, या ठिकाणी मनपाच्या इंजिनियरकडून बसवण्यात आलेल्या एका ड्रेनेजच्या पाईपची चांगलीच चर्चा होताना दिसते. इंजिनियरने अशा प्रकारे ड्रेनेजची पाईप जोडली आहे की, भविष्यात चेंबर चोकअप झाल्यानंतर या चेंबरला पट्टी कशा पद्धतीने मारायची? हा प्रश्न पडला आहे.
अहमदनगर येथील सुनील प्रकाश त्रिपाठी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अहमदनगर येथील मनपाच्या इंजिनियरकडून करण्यात आलेल्या एका चेंबरच्या कामाचा फोटो पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी इंजिनियसच्या सुपर बुद्धीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
https://www.facebook.com/100015570372135/posts/pfbid02qKBjVEVBFLX76pMsDnJ9FyZ4TDg15z1P9UAUSnEjintY1oXGuJZsE8Z7qZTCf5i5l/?mibextid=Nif5oz
सुनील त्रिपाठी यांनी जो एक फोटो पोस्ट केला आहे त्यामध्ये एका पाण्याच्या पाईपच्या दोन्ही बाजूला चुकीच्या पद्धतीने इंजिनियरकडून दोन ड्रेनेजची पाईप बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात चेंबर चोकअप झाल्यानंतर या चेंबरला पट्टी कशा पद्धतीने मारायची हा प्रश्न इंजिनियरनेच सोडवला तर बरे होईल? असा सवाल त्रिपाठी यांनी केला आहे.