हॅलो हेल्थ । कोंड्यामुळे अनेकांना चारचौघांमध्ये मिसळताना विशेष काळजी घ्यावी लागते . कोंड्यावर अनेक तेल आणि औषधे देखील आहेत . परंतु हे काही घरगुती उपाय केल्यास , नक्की कोंडा जाण्यास मदत होईल.
१. दही –
दह्यामधील ऍसिटिक गुणधर्मांमुळे ते कोंड्यासाठी चांगला उपाय आहे . दही २ दिवस आंबट होण्यासाठी ठेवा . त्यानंतर हे दही डोक्यावर लावून किमान १ तास ठेवावे आणि त्यानंतर माईल्ड शाम्पूने धुवून टाकावे . हा उपाय आठवड्यातून २ वेळा करावा .
२. मेहेंदी –
कित्येक वर्षांपासून मेहेंदीचा उपयोग हा कंडिशनिंग आणि रंग चढवण्यासाठी केला जातो . पण मेहेंदी मध्ये असे काही गुणधर्म आहेत , ज्यामुळे कोंड्यापासून देखील मुक्ती मिळते.
३. कोरफड –
कोरफडीमध्ये अनेक असे गुणधर्म आहेत . ताजा कोरफडीचा गर काढून केसाच्या मुळांना लावावा . १ तासाने केस माईल्ड शाम्पूने धून टाका .
४. मेथी – मेथ्या घरामध्ये सहजा सहजी मिळतात. मेथ्याने थंडावा मिळतो . तसेच इन्फेक्शन देखील दूर होते.
५. डाळीचे पीठ –
डाळीच्या पीठाने कंडिशनिंग होते . डोक्याच्या त्वचेची स्वच्छता करण्यासाठी डाळीच्या पीठाने केस धुवावेत.
६. कडुनिंब –
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावेत . कडुलिंब अँटिफंगल आले त्यामुळे कोंड्यासह ऍलर्जी देखील दूर होते.
७. तुळस –
तुळशीची पाने आणि आवळा पावडर पाण्यात एकत्र करून हा पॅक लावावा . १ तासाने केस धुवून टाकावे.
८. लिंबू –
लिंबाचा रस कोंड्यासाठी रामबाण उपाय आहे . लिंबाचा रस पाण्यात घालून त्याने केस धुवून मग या लिंबूरसाच्या पाण्याने केस धुवून काढा.
९. आल आणि बिट –
आल आणि बिट पेस्ट एकत्र हे मिश्रण रात्री झोपताना लावावे . सकाळी धुवून टाकावे या उपायाने ४ – ५ दिवसात कोंडा निघून जाईन.
१०.सफरचंद –
संत्री – संत्री आणि सागरचंदाची पेस्ट करून हे मिश्रण अर्धा तास केसाच्या मुळांना लावून ठेवा. अर्धा तासाने माईल्ड शाम्पूने धुवून टाका .