शत्रूला धडकी भरवणाऱ्या ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची DRDO कडून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली । भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून (DRDO) ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक मिसाईलची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली. बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कमी पल्ल्याच्या लक्ष्यावर अचूक मारा करणाऱ्या पृथ्वी मिसाईलचे डिझाइन स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (SFC) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) केले आहे.

आजच्या चाचणीत पृथ्वी मिसाईलने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी ही मिसाईल अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अत्याधुनिक मिसाईल चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आली. तसंच ही चाचणी यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात आलं. “३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारी ही मिसाईल आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

पृथ्वी मिसाईलची वैशिष्ट्ये
पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी कमी पल्ल्याची बॅलेस्टिकमिसाईल आहे. ही मिसाईल सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकते. पृथ्वी या सीरिजची तीन मिसाईल आहेत. पृथ्वी-I, II, III ही मिसाईल असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

You might also like