हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी काही चांगल्या सवयींचे नियमित पालन करणे. आपल्या शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे नियमितपणे ७ ते ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. पुरेसे पाणी शरीराला न मिळाल्याने अनेक गंभीर व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शरीराला आवश्यक असणारे पाणी त्याला देणे गरजेचे आहे.
अनेक लोक दिवसभर आपल्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना पाणी पिण्याचे लक्षातच राहत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी जितकं शक्य आहे तितकं पाणी पिऊन झोपतात. (Drinking Water) तुम्हालाही अशी सवय आहे का? असेल तर आत्ताच सोडा. कारण बहुतांश आरोग्य तज्ञ हे रात्री झोपण्यापूर्वी पाणी न पिण्याचा सल्ला देतात. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. ज्याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया झोपण्यापूर्वी अधिक पाणी प्यायल्याने आपल्या शरीराचे कसे आणि काय नुकसान होते?
झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीराचे होते नुकसान (Drinking Water)
1) अर्धवट झोप – जर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिऊन झोपण्याची सवय असेल तर तुमची झोपमोड होण्याची शक्यता असते. कारण जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवी आल्याचे जाणवते. ज्यामुळे सतत जाग येते आणि तुमची शांत झोप अशांत होते. परिणामी अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर शरीरात थकवा जाणवतो. शिवाय अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
2) पोटाच्या समस्या – (Drinking Water) रात्रीच्या वेळी सतत तहान लागत असेल तर पेलाभर पाणी प्या. मात्र त्याहून जास्त पाणी प्यायल्याने एक तर तुमची झोपमोड होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचणार नाही. परिणामी अपचन, पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतील. शिवाय शारीरिक थकवा देखील जाणवेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी अति पाणी पिण्याचा अट्टाहास नको.
3) किडनीच्या समस्या – आपल्या शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त पाणी पिणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही अधिक पाणी पीत असाल तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कारण रात्री आपण झोपलो असताना आपल्या शरीरातील क्रिया संथ गतीने सुरु असतात. (Drinking Water) अशावेळी अधिक पाणी प्यायल्याने किडनीवर पाणी फिल्टर करण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त दबाव पडतो. जे किडनीच्या आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगले मानले जात नाही. परिणामी किडनीशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात.
4) हाय ब्लड प्रेशरचा धोका – रात्री झोपण्यापूर्वी अधिक पाणी प्यायल्याने तुमची झोप खराब होते. अनिद्रेचा त्रास सुरू होतो. ज्यामुळे उच्च रक्त दाबाचा धोका निर्माण होऊ शकतो. या समस्येला सामोरे जायचे नसेल तर रुग्णांनी झोपण्यापूर्वी १ ते २ तास आधी पाणी प्यावे. मात्र झोपण्याआधी एक ग्लास पाणी देखील प्यायल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Drinking Water)