हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ड्रायव्हिंग लायसन्स च्या नियमात सरकार कडून काही बदल करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन परवाना मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम लागू देखील झाले आहेत. यामुळे ते ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडून असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नोंदणी करून शकता. अर्जदाराला ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल. अन् तिथेच टेस्ट द्यावी लागेल. त्यानुसार टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला परवाना देण्यात येईल.
मंत्रालयाने ड्रायव्हिंग सेंटर स्कूलसाठी काही नियम आणि अटीही घालून दिल्या आहेत. त्यानुसार अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी निंग सेंटर्सकडे किमान एक एकर जागा आहे, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी निंग सेंटर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.