व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करताना चौथ्या मजल्याहून कोसळून तरुणाचा मृत्यू

पुणे : हॅलो महाराष्ट्र – लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. अनेकदा हि नशा आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकते. दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडली (drunk man dies after falling from building) आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला (drunk man dies after falling from building). या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी शहरातील निगडी परिसरातल्या सेक्टर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या अकरा नंबर बिल्डिंगमध्ये घडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव अनिल कांबळे असे आहे. या व्यक्तीचे वय 50 वर्षे होते. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. हा व्यक्ती कापडाच्या मदतीने खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि त्याचा जागीच मृत्यू (drunk man dies after falling from building) झाला. या घटनेचा व्हिडिओ इमारतीखाली उभा असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर