Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ducati Streetfighter V2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ducati India ने भारतीय बाजारपेठेत आपली (Ducati Streetfighter V2) नवीन प्रीमियम बाईक Streetfighter V2 लॉन्च केली आहे. ही बाईक एकाच प्रकारात आणि एकाच रंगात लॉंच करण्यात आली आहे. या दमदार स्पोर्ट बाईकची एक्स-शोरूम किंमत 17.25 लाख रुपये आहे. या गाडीचा थेट सामना ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, BMW F 990 R आणि Kawasaki Z900 सारख्या गाड्यांशी होईल. चला जाणून घेऊया या बाईकचे काही खास वैशिष्ट्ये….

 4.3-इंच फुल-टीएफटी डॅशबोर्ड-

या नवीन (Ducati Streetfighter V2) मॉडेलमध्ये फुल-एलईडी लाइटिंग आणि 4.3-इंच फुल-टीएफटी डॅशबोर्ड आहे. नवीन बाईकमध्ये मस्क्यूलर फ्युएल टँक, सिल्व्हर रंगाचे रेडिएटर , स्पोर्टी इंजिन काउल, स्टेप-अप सॅडल, सिंगल साइड स्विंगआर्म आणि अंडरबेली एक्झॉस्ट सेटअप आहे.

Ducati Streetfighter V2

 955 Cc इंजिन- (Ducati Streetfighter V2)

गाडीच्या इंजिनबाबत बोलायचं झाल्यास या स्पोर्ट बाईकला 955 Cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 10750 rpm वर 150.9 bhp पॉवर आणि 9000 rpm वर 101.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेल असेल. या बाईकला (Ducati Streetfighter V2) तीन राइडिंग मोड आहेत, ज्यात स्पोर्ट, रोड आणि वेट मोड समाविष्ट आहेत. बाईकमध्ये पॉवर मोड देखील देण्यात आला आहे.

Ducati Streetfighter V2

वैशिष्ट्ये-

या बाइकमध्ये स्लाइड-बाय-ब्रेक (Ducati Streetfighter V2) फंक्शनसह कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, व्हील कंट्रोल, ए- डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Streetfighter V2 बाईकच्या सर्विससाठी 12,000 किमी राइडिंग किंवा 12 महिने सेट केले आहे. त्याच वेळी, प्रत्येक 24,000 किमी राइडिंगनंतर, व्हॉल्व्ह क्लिअरन्स तपासावा लागणार आहे.बाईकचा सर्व्हिस इंटरव्हल 12,000 किमी/12 महिन्यांपर्यंत आहे. वाल्व क्लिअरन्स चेक इंटरव्हल 24,000 किमी पर्यंत आहे. सस्पेन्शन ड्युटीसाठी हार्डवेअरमध्ये ४३ मिमी शोवा बीपीएफ फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनो-शॉकचा समावेश आहे.

हे पण वाचा :

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज

Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV

Royal Enfield Hunter 350 : दमदार फिचर्स आणि स्टाइलिश लूकसह लॉंच होणार hunter 350 बुलेट