कराड प्रतिनिधी | कृष्णा नदीने पुराचा कहर केल्याने कराड शहरात पाणी शिरले आहे. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराडला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात झालेल्या वादातूनच कराड मध्ये हि पूर परिस्थिती उदभवली आहे असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.
कराडमधील पाटील कॉलनीला संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ३९ कोटीचे टेंडर काढण्यात आले होते. त्याचे काम निम्मे आले असताना अजित पवार यांनी हि भिंत दगडी नबांधता ती सिमेंट काँक्रेडने बांधायचे खुसपट काढले. त्यात हे काम असेच बाळगले. म्हणून अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादातूनच आज कराडला हि परिस्थिती बघण्याची वेळ येत आहे असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.
पाटील कॉलनीच्या संरक्षक भिंतीचे सध्या १८ कोटीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आपण २५ ऑगस्टपर्यंत टेंडर काढून कामाला येत्या महिनाअखेर सुरुवात करू असे विजय शिवतारे यांनी म्हणले आहे. राजकारणाचा आणि कोणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. मात्र ज्या वादामुळे हे काम पडून राहिले त्यावर बोलावेच लागेल असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.