सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आता सांगली जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर नागरिकांनी इमेल अथवा टपालाद्वारे कामे सांगितली तर त्याची लवकरात लवकर। सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हापरिषदेत सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
अधिकारी ,कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटाइझर, सोशल डिस्टनसेसची सक्ती करण्यात आली आहे. आज गुरुवार पासून कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. एकंदर जिल्हापरिषदेची यंत्रणा तिसऱ्या लाटेला थोपविन्यासाठी सज्ज असल्याची माहिती उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली आहे.