कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी देण्याचे कामही महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे शक्य झाल्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या ४९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक बजरंग पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शारदा पवार यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, व्हा.चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, युवा नेते जशराज पाटील(बाबा), सुरेश पाटील, मारुती बुधे, सौ.संगीता साळुंखे, सौ.सुरेखा जाधव, श्रीमती प्रभावती माळी, तानाजीराव साळुंखे, सुहास बोराटे, रणजीत फाळके, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, तसेच कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.