PFI च्या निशाण्यावर कोण?? धक्कादायक माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या देशभरातील कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने छापेमारी केली होती तसेच काही लोकांना ताब्यात घेतले होते . या चौकशी दरम्यान यंत्रणेने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे . भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) संबंधित अनेक बडे नेते PFI च्या टोर्गेटवर होते असा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र्र एटीएस ने केला आहे.

पीएफआयच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक बडे नेते होते. याशिवाय नागपूरचे आरएसएसचे मुख्यालयही त्यांच्या टार्गेट वर होते . यासाठी पीएफआयच्या सदस्यांनी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या आरएसएसच्या पथसंचलनाची माहितीही गोळा केली होती अशी माहिती महाराष्ट्र ATSच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआय सदस्यांनी लखनौ-बाराबंकी सीमेवरील काकोरी, कुर्सी गावात प्रशिक्षण शिबिर उभारले होते. जिथे लोकांना लव्ह-जिहाद, धर्मांतर कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली. यासोबतच असे करणाऱ्यांना संस्थेसारख्या बक्षीस योजनांची माहिती देण्यात आली. नुकताच लखनौमध्ये अटक झालेला उमर गौतम धर्मांतर करायचा. ते SDPI चे सक्रिय सदस्य तसेच हाल-हराम अकादमीचे उपाध्यक्ष होते.