हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत सरकार नेहमीच अल्प उत्पन्न गटासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. ज्यात समाजातील आर्थिकरीत्या दुर्बल असणाऱ्या समूहाला नजरेसमोर ठेवून त्यांचे जगणे हे कश्या प्रकारे सुसह्य होईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले जाते . आजवर सरकारने भारतातील अश्या बऱ्याच योजना अंमलात आणून त्या यशस्वी केल्या आहते ज्याचा लाभ हा आजही भारतातील जनता घेत आहे. भारतात मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कामगारांसाठी भारत सरकारने ‘ई श्रम कार्ड'(E- Shram Card) योजना अंमलात आणलीं आहे ज्या योगे त्यांना आर्थिक मदत उपलब्ध होईल.
ई-श्रम कार्ड (E- Shram Card) मिळवण्यासाठी सर्वप्रथम ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल . आतापर्यंत 28.50 कोटींपर्यंत मोल मजुरी करणाऱ्या कामगारांनी ह्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे . या पैकी 8.2 कोटी ई -श्रम कार्डचे रजिस्ट्रेशन हे फक्त उत्तर प्रदेशमधूनच भरण्यात आले आहे. त्या नंतर बिहार,पश्चिम बंगाल,मध्य प्रदेश आणि ओडिसामधील श्रमिक आणि मजुरांनी आपले नावे ह्या योजनेसाठी नोंदवले आहे.
काय आहेत ई श्रम कार्डचे फायदे?
ह्या कार्डच्या माध्यमातून कार्डधारक सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात . भविष्यात भारत सरकार कार्ड धारकांच्या बँक खात्यात एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात जमा करेल. त्यामुळे म्हातारपणी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. जर मजूर कार्ड धारकाच्या घरी एखादा मुलगा वा मुलगी असेल आणि त्यांना शिकायचे असेल तर सरकार त्यांना शिष्यवृत्ती देईल ज्यायोगे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल . तसेच घर बनवण्यासाठी सरकार कमी व्याजदरावर कर्जही उपलब्ध करून देईल .
जर एखादा मजूर काम करताना अपंग झाला तर त्याला 1,00000 रुपये देण्यात येतील . ह्या व्यतिरिक्त जर काम करताना मजूर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या घरातील सदस्यांना 2,00000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल.
कोणाकोणाला मिळणार ई श्रम कार्डचा फायदा?
जर ई श्रम कार्डधारक मजूर,प्रवासी कामगार ,शेत मजूर,घरकाम करणारा ,ओझे वाहणारा ,रिक्षा चालक ,ब्युटीपार्लर वर्कर,सफाई कर्मचारी,गार्ड,न्हावी,मोची ,इलेकट्रीशियन, प्लम्बर हे सर्व जण ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता. ईपीएफओ (EPFO) मेंबर ,सरकारी पेन्शन धारकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अश्या प्रकारे तुम्ही करू शकता ई-श्रमिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन
ई-श्रमिक कार्डवर अर्ज करण्यासाठीची पद्धत खूपच सोपी आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन ही भरू शकता. त्यासाठी सर्वप्रथम ई श्रम पोर्टलच्या वेबसाइट eshram.gov.in वर क्लीक करा . तिथे उपलब्ध असलेला अर्जाचा फॉर्म भरून सबमिट करा. अश्या प्रकारे अगदी सहजरीत्या ई-श्रमिक कार्डसाठी तुम्ही आपला अर्ज भरू शकता . भारत सरकारने सरकार 14434 ह्या टोल फ्री नंबरवर देखील ई-श्रमिक कार्डबाबत सखोल माहिती मिळवण्यासाठी फोन करू शकता. त्या नंतर काही दिवसांतच ई श्रर्म कार्ड बनून तयार होईल
ई-श्रर्म कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं
ई-श्रर्म कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक,मोबाईल नंबर हा आधार कार्ड ला लिंक असावा. आजवर देशात खूप मोठ्याप्रमाणात मजूर आणि श्रमिकांनी ह्या योजनेचा फायदा घेतला आहे .