हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या डिसेंबर महिन्यापासून गेटवे ते बेलापूर-नवी मुंबईदरम्यान ई-वॉटर टॅक्सी धावणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीचे भाडे प्रवाशांसाठी फक्त 100 ते 150 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून ई-वॉटर टॅक्सीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या वॉटर टॅक्सीला भाडेदर जास्त असल्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ई-वॉटर टॅक्सीची सेवा बंद करण्यात आली. मात्र आता ई-वॉटर टॅक्सीचे दर कमी करून तिला पुन्हा प्रवाशांसाठी सेवेत आणण्यात आले आहे.
100 ते 150 रुपयांच्या भाडे
मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पर्यटकांचा प्रवास सुलाभ व्हावा यासाठी ई-वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबई ते मुंबई गेटवे आणि गेटवे ते बेलापूर- नवी मुंबई असा प्रवास पर्यटकांना जलवाहतूक मार्गाने करता येणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीचे भाडे 100 ते 150 रुपयांच्या आतच असेल. यापूर्वी याच वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र आता या प्रवासाचे दर पूर्णपणे कमी करण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे, जलवाहतुकीसाठी एकूण चार वॉटरटॅक्सीची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोन वॉटर टॅक्सची क्षमता 24 प्रवासी वाहून नेण्याची आहे तसेच तिसऱ्या वॉटर टॅक्सची क्षमता दहा प्रवाशांना घेऊन जाण्याची आहे तर चौथ्या वॉटर टॅक्सीची क्षमता 24 प्रवाशांना ने आण करण्याचे आहे. यातील डिसेंबर महिन्यात 24 क्षमता असलेली वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे.
वॉटर टॅक्सीची खासियत
विशेष बाब म्हणजे ही वॉटर टॅक्सी विजेवर चालणारी आहे त्यामुळे तिच्यावर पेट्रोल डिझेलसाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. ही टॅक्सी अर्धा तास चार्ज केली तरी सहा तास चालू शकेल. यामुळे प्रदूषण देखील होणार नाही तसेच अन्य वाहतुकीच्या साधनांपेक्षा ही टॅक्सी सर्वात जास्त वेगाने धावेल तसेच यामुळे प्रवास वेळ देखील कमी होईल. यात ही टॅक्सी गेटवे ते बेलापूर नवी मुंबईमधील अंतर फक्त एका तासात पार करू शकेल.
दरम्यान, वॉटर टॅक्सी ‘गेटवे ते बेलापूर नवी मुंबई’ यादरम्यान चालवण्यात येईल. मुंबई सागरी मंडळ, मुंबई बंदर प्राधिकरणाच्यावतीने वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये प्रदूषणाचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सी सर्वात जास्त फायद्याची ठरेल. महत्वाचे म्हणजे या वॉटर टॅक्सीचे दर देखील कमी असल्यामुळे ग्राहकांकडून तिला जास्त पसंती मिळेल.