हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याकडे मार्केटमध्ये किंवा जिथे लोकं अगदी सहजपणे पोहोचू शकतील अशी एखादी जागा असेल तर आपल्याला बँकेच्या ATM ची फ्रँचायझी घेऊन घरबसल्या दरमहा 60-70 हजार रुपये कमवता येतील. यासाठी आपल्याला फक्त बँक किंवा संबंधित एटीएम कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
एटीएम मशीन हे कधीही कोणत्याही बँकेद्वारे इन्स्टॉल केले जात नाही. हे काम एका स्वतंत्र कंपनीकडून केले जाते. त्यासाठी बँकेकडून संबंधित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. मात्र यासाठी काही अटी असतील… टाटा इंडिकॅश कंपनीकडून SBI ATM बसवण्याचे काम केले जाते. मात्र त्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. हे लक्षात घ्या कि, भारतात एटीएम बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट फक्त टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत आहे.
SBI ATM फ्रँचायझी घेण्याच्या अटी
यासाठी 50-80 चौरस फूट जागा लागेल.
तसेच इतर एटीएम पासून आपल्या ठिकाणाचे अंतर 100 मीटर असावे.
तळमजला आणि चांगली दिसणारी जागा आवश्यक असेल.
तसेच 24 तास वीज उपलब्ध असावी.
1 किलोवॅट वीज कनेक्शन आवश्यक असेल.
300 ट्रान्सझॅक्शन क्षमता असलेली जागा आवश्यक असेल.
एटीएम च्या जागेवर काँक्रीटचे छत असावे.
सोसायटी किंवा संबंधित अथॉरिटीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल.
खर्च आणि उत्पन्न
हे लक्षात घ्या कि, टाटा इंडिकॅश ही फ्रँचायझी देणारी सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाखांच्या सिक्योरिटी डिपॉझिट्सवर फ्रँचायझी देते. तसेच ही रक्कम परत देखील केली जाते. याशिवाय वर्किंग कॅपिटल म्हणून 3 लाख रुपयेही जमा करावे लागतील. अशा प्रकारे, यामध्ये आपली एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. आता त्याद्वारे केलेल्या प्रत्येक कॅश ट्रान्सझॅक्शन वर 8 रुपये तर नॉन-कॅश ट्रान्सझॅक्शनवर 2 रुपये मिळतात.
अशा प्रकारे SBI ATM फ्रँचायझीसाठी करता येईल अर्ज
यासाठी सर्वांत आधी SBI एटीएम साठी कोणती कंपनी फ्रँचायझी देते याची सविस्तरपणे माहिती जाणून घ्यावी लागेल. इथे हे लक्षात घ्या की, मुथूट एटीएम, टाटा इंडिकॅश आणि इंडिया वन एटीएम सारख्या कंपन्या एटीएम इन्स्टॉल करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतात. जर आपल्यालाही एटीएम घ्यायचे असेल तर संबंधित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ऑनलाइन लॉग इन करून एटीएमसाठी अर्ज करा.
‘या’ कंपन्यांची वेबसाईट खालील प्रमाणे आहे
टाटा इंडिकॅशची http://www.indicash.co.in ,
मुथूट एटीएमची http://www.muthootatm.com/suggest-atm.html ,
इंडिया वन एटीएम – http://india1atm.in/rent-your-space
हे पण वाचा :
HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले
‘या’ बँकांकडून दिले जात आहे सर्वात स्वस्त Car Loan, व्याज दर तपासा
Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!
ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी !!! नवीन दर पहा