हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या साथीमुळे जगभरात लॉकडाऊन लादण्यात आले होते. ज्यानंतर अनेक लोकांना घरातूनच काम करावे लागले. यानंतर जगभरात आता वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली आहे. मात्र आता अनेक लोकं त्याकडे आकर्षित होत आहेत. यामागे अनेक कारणे देखील आहेत. कारण वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफिसला जाण्यासाठी सकाळी वेळेवर उठण्याची गरज भासत नाही. तसेच ऑफिसमध्ये येण्यासाठी तासन्तास प्रवासही करावा लागत नाही. याशिवाय ऑफिसमुळे आपल्या कुटुंबालाही वेळ देता येऊ लागला आहे. यामुळे प्रवास खर्च तर वाचतोच त्याचबरोबर काम संपल्यानंतर उरलेल्या वेळेत एखादे आवडते कामही करता येते.
सध्याच्या काळात अशा अनेक अनेक वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मदतीने आपल्याला घर बसल्या भरपूर पैसे कमावता येतात. यासाठी कुठेही जाण्याची गरज देखील भासत नाही. चला तर मग आज आपण घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवता येतील याबातची माहिती जाणून घेऊयात…
फ्रीलान्सिंग
आजकाल फ्रीलान्सिंगची क्रेझ चांगलीच वाढली आहे. कारण फ्रीलान्सिंग करूनही लोकं भरपूर पैसे कमावत आहेत. त्याच बरोबर अनेक कंपन्यांकडून फिव्हर आणि अपवर्क सारख्या वेबसाइटवर लोकांना कामे देखील दिली जातात. या प्लॅटफॉर्मवर आयडी तयार करून एडिटिंग, कंटेंट रायटिंग, वेबसाईट डिझायनिंग सारख्या आपल्या कौशल्यांनुसार कामे घेता येतील. मात्र आपल्याकडे यासाठी चांगला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन लागेल. Earn Money
ऑनलाइन स्टोअर
आपल्याला Shopify सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्वतःचे स्टोअर तयार करून आपले प्रॉडक्ट्स विकता येतील. या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल प्रॉडक्ट्स विकता येतील. याशिवाय Meesho App वरही प्रॉडक्ट्स विकून पैसे कमावता येतील. Earn Money
कंटेंट रायटिंग
जर आपल्याला लिखाणाची आवड असेल तर आपण घरबसल्या आपले करिअर बनवू शकाल. ब्लॉग रायटिंग, कॉपीरायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग इत्यादी रायटिंगचे अनेक प्रकार आहेत. pepper सारख्या अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे आपल्याला अनेक क्लायंट मिळतील. याद्वारे आपल्याला वेगवेगळ्या वेबसाइटवर लिहिण्यासाठी ब्लॉग दिले जातात. मात्र त्यासाठी डेडलाइन देखील असेल. यासाठी आपण प्रति शब्द 1 रुपये शुल्क आकारू शकता आणि आपल्या अनुभवानुसार आपले पेमेंट वाढवू शकता. Earn Money
फोटोग्राफी
जर आपल्या चांगली फोटोग्राफी येत असेल आणि आपल्याकडे चांगला कॅमेरा असेल तर हा जॉब आपल्यासाठी योग्य ठरेल. कारण आपल्याला ऑनलाइन फोटो विकूनही चांगले पैसे कमवता येतील. यासाठी सध्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहेत, जिथे आपल्याला फोटो अपलोड करून ते विकता येतील. याशिवाय ऑनलाइन फोटो ऑक्शनमध्येही सहभागी होता येईल. इथे हे लक्षात घ्या कि, आपला फोटो जितका चांगला असेल तितकी त्याची किंमत वाढेल. Earn Money
याशिवाय ऑनलाइन ट्युटोरिंग, यूट्यूबच्या माध्यमातून, ब्लॉगद्वारे, संलग्न मार्केटिंगद्वारेही पैसे कमावता येतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.meesho.com/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा