हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्याच्या काळात पैसे गुंतवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोकं शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. आता तर क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये गुंतवणूक जोखीम आणि निश्चित रिटर्न देखील नसतो. मात्र, पैसे सुरक्षित तर राहतीलच आणि गॅरेंटेड रिटर्न देखील मिळेल अशा गुंतवणुकीच्या योजना लोकं शोधत असतात.
मात्र कोणतीही जोखीम नको असेल तर भारतीय Post Office कडून दिल्या जाणाऱ्या लहान बचत योजना अतिशय योग्य ठरतील. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना ही छोटी बचत योजना देखील मोठा फायदा मिळवून देते. यामध्ये दररोज 50 रुपये म्हणजेच दरमहा रुपये 1500 जमा करून 35 लाख रुपयांचा फंड तयार करता येईल.
ग्राम सुरक्षा योजना काय आहे ???
या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला संपूर्ण 35 लाखांचा लाभ दिला जातो. तसेच गुंतवणूकदाराला 80 व्या वर्षी या योजनेची ही रक्कम बोनससह मिळते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती 80 वर्षांच्या आधी मरण पावली तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम दिली जाते. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल. यामध्ये 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरता येईल. Post Office
अशा प्रकारे प्रीमियमचे कॅल्क्युलेशन असेल
जर ही पॉलिसी वयाच्या 19 व्या वर्षी खरेदी केली तर वयाच्या 55 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशाच प्रकारे 58 वर्षांसाठी 1463 रुपये प्रीमियम भरावा लागेल आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. Post Office
ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतल्यानंतर लोन देखील घेऊ शकता. मात्र पॉलिसी घेतल्यानंतर 4 वर्षांनीच कर्ज घेता येते. याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही वेळी प्रीमियम भरण्यात डिफॉल्ट केल्यास प्रलंबित प्रीमियमची रक्कम भरून ती पुन्हा सुरू करता येते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/rpli.aspx
हे पण वाचा :
Asia Cup 2022 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार !!!
EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना EPFO कडून दिली जाते पेंशन !!!
Medicine : ‘या’ 19 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदीची टांगती तलवार !!!