आता घरबसल्या ऑनलाइन दररोज कमवा 1,000 रुपये, त्यासाठी काय करायचे ते जाणून घ्या

SIP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण तंत्रज्ञानाच्या अशा युगात आहोत, जिथे झटक्यात आपण हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने खरेदी, सर्व्हिसेस सह हजारो कामे अगदी सोपी झाली आहेत. त्याद्वारे तुम्ही भरपूर कमाई देखील करू शकता. जर तुम्ही अशा लोकांपैकी नसाल ज्यांना ऑफिसमध्ये काम करायचे आहे किंवा तुमच्याकडे कोणतीही नोकरी नाही, तर आम्ही तुम्हाला अशा काही पर्यायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

डेटा एंट्री
सध्याच्या ऑनलाइन जगात, कंपन्या दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील डेटा गोळा करतात आणि त्यांच्या सिस्टममध्ये सेव्ह करतात. या कामात गुंतलेल्या बहुतेक कंपन्या आउटसोर्सिंगचा वापर करतात. जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आणि इंटरनेट सुविधा असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीत टायपिस्ट, कोडर, ट्रान्सक्रिबर, वर्ड प्रोसेसर आणि डेटा प्रोसेसर म्हणून रुजू होऊन दररोज 300 ते 1,000 रुपये कमवू शकता.

ऑनलाइन एज्युकेटर
कोरोना महामारीमुळे शिक्षण पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना इच्छित क्लास घरबसल्या मिळतो आणि पैशांसोबतच त्यांचा प्रवासाचा वेळही वाचतो. यासाठी बाजारात दररोज नवनवीन अ‍ॅप येत असून ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. तुम्हालाही शैक्षणिक क्षेत्रात रस असेल आणि कोणत्याही विषयावर तुमची पकड असेल, तर तुम्ही ऑनलाइन अभ्यासाद्वारे दररोज 1000 ते 3 हजार कमवू शकता.

व्हर्चुअल असिस्टंट
जर तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील तांत्रिक किंवा प्रशासकीय कौशल्य असेल, तर तुम्ही ऑनलाइन माध्यमातून संबंधित छोट्या व्यवसायांना आवश्यक सल्ला किंवा इतर मदत देऊ शकता. व्हर्च्युअल असिस्टंट व्यावसायिकांमध्ये वेगाने उदयास येणारा जॉब बनत आहे. यासाठी तुम्ही व्हर्च्युअल मीटिंग, प्रेझेंटेशन, फोन कॉल किंवा वेबसाइटद्वारे तुमच्या सर्व्हिस देऊ शकता. एमएस ऑफिस, कम्युनिकेशन आणि टाइम मॅनेजमेंट स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही एका तासासाठी 500 ते 1,500 रुपये शुल्क आकारू शकता.

कंटेंट रायटर
हा ऑनलाइन जॉब सर्वाधिक प्रचलित आहे, कारण कोणत्याही वेबसाइट किंवा कंपनीसाठी कंटेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची कोणत्याही विषयावर चांगली पकड असेल आणि तुम्ही शब्दांचे जादूगार असाल, तर अवघे काही तास काम करून दिवसाला 1,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणे ही काही मोठी गोष्ट नाही. रेझ्युमे रायटिंग, लीगल रायटिंग, क्रिएटिव्ह रायटिंग, एसइओ रायटिंग किंवा प्रूफ रीडिंग याद्वारे तुम्ही दर तासाला कमाई करू शकता.

ट्रान्सक्रिप्शनिस्ट
गिग जॉब म्हणून हे खूप वेगाने वाढणारे फील्ड आहे. ट्रान्सक्रिप्शनिस्ट ही अशी व्यक्ती आहे जी डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करते. तुमचे टायपिंग कौशल्य चांगले असेल तर तुम्ही अगदी आरामात या कामातून घरबसल्या हजारो रुपये कमवू शकता.

ट्रान्सलेटर
या कामासाठी, तुमच्यासाठी दोन किंवा जास्त भाषांवर कमांड असणे खूप महत्वाचे आहे. इंटरनॅशनल बिझनेस, लेखक, स्‍कॉलर आणि इतर क्षेत्रातही ट्रान्सलेटर्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामध्ये प्रति शब्द 1 रुपये ते 5 रुपये पेमेंट केले जाते.