एका एकरात दोन लाखांची कमाई! तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन घ्या लागवड पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करताना दिसत आहेत. एका शेतकऱ्याने एक एकर मध्ये गवती चहा चहा पिकाचे उत्पादन घेत तब्बल दोन लाखांची कमाई केली आहे.
मेहनत कमी उत्पन्न जास्त

-गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं.
– गवती चहाची शेती करणारे शेतकरी यावर नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही, असं सांगतात.
-प्राण्यांचा कोणताही त्रास गवती चहाला नसतो.
-गवती चहाची लागवड केल्यानंतर एकदा त्याची खुरपणी करावी लागते.
-त्यानंतर वर्षातून चार पाच वेळा पाणी द्यावं लागतं.
-यामुळे कमी मेहनत आणि जादा आर्थिक उत्पन्न असल्यानं शेतकरी गवती चहाच्या शेतीकडे वळत आहेत.

कशी कराल गावती चहाची शेती

-गवती चहाची शेती भात शेतीप्रमाणं केली जाते.
-याच्या बियांपासून नर्सरीमध्ये रोपं बनवली जातात.
-त्यानंतर रोपं वाढली की तिथून काढून जमिनीमध्ये लावली जातात.
-एका हेक्टरवर गवती चहा लावायचा असल्यास त्यासाठी रोपं तयार करण्यासाठी 4 किलो बियाणं लागते.

भारतात गवती चहाची शेती केरळ, तामिळनाडू, आसाम,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांमध्ये होते. देशातील इतर राज्यांमध्ये गवतीचहाच्या शेतीचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. तिथे देखील याची शेती करण्यासाठी प्रोस्ताहन दिलं जात आहे. गवतीचहाच्या शेतीसाठी नाबार्डकडून कर्ज देखील दिलं जाते.गवती चहाची शेती कमी पावसाच्या प्रदेशातही केली जाते.

गवती चहाचे उपयोग

गवती चहाच्या पानांपासून तेल बनवलं जाते. गवती चहाच्या तेलाला जास्त मागणी आहे. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या गवती चहाची खरेदी करतात. औषध, सौंदर्य प्रसाधन आणि साबण बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्यान आणि सिंट्रालचं प्रमाण असल्यानं याची मागणी कायम असते. कोरोना काळात गवती चहाच्या तेलाचा वापर सॅनिटायझर बनवण्यासाठी देखील होत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group