नंदूरबार । नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील अनेक गावात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे. शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’