कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रुग्णालयाच्या शवागारात एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये मृत महिलेच्या कुटूंबियांनी संतापाच्या भरात रुग्णालयाबाहेर गोधळ घातला आहे. यामध्ये मृत महिलेच्या नवऱ्याला तिच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या पतीला तर चक्क चपलेने मारहाण केली आहे. वर्धमान जिल्ह्यातील कालना परिसरात हा प्रकार घडला आहे. रेल्वे रुळांजवळ विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र आपल्या मुलीचा मृत्यू अपघाती झाला नसून सासरच्या माणसांनी आपल्या मुलीची हत्या केली, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात नंदई रेल्वे लाईनजवळ सोमवारी शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मृत महिलेचे संतप्त नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या जावयावर व सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला. शर्मिलाचे सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा दावा मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
माहेरच्या लोकांकडून नवऱ्याला मारहाण
मृत शर्मिला रुईदासचा पती बनेश्वर दास हा अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करत होता. आपल्या मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना एवढा संताप अनावर झाला होता, की त्यांनी तिच्या पतीला शवागारातून बाहेर गाडीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच त्यांनी महिलेच्या सासरच्या मंडळींनाही चपलेने मारहाण केली. या प्रकारानंतर काही काळ रुग्णालयाबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
हे पण वाचा :
अहो आश्चर्यम !! एकही नट-बोल्ट न वापरता बनवला आहे ‘हा’ ब्रीज
साताऱ्याचे जवान सुधीर निकम मुंबईत कर्तव्य बजावताना शहीद
SBI ने ‘या’ डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली 0.90% पर्यंत वाढ
‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा
Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट