नागपूर प्रतिनिधी। राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ासह इतरही जिल्ह्य़ात तेली समाजाची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पूर्वी हा समाज काँग्रेससोबत होता. मात्र मागील काही निवडणुकांत भाजपने या समाजाच्या नेत्यांना मोठय़ा प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्याने तो भाजपकडे वळला होता. त्यामुळे भाजपला यशही मिळाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वरूपात या समाजाला विदर्भातून राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले होते. त्यांना कामठीतून उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनाही त्यांच्यावर निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्कीच्या प्रकरणावरून उमेदवारी नाकारण्यात आली. वर्धा जिल्ह्य़ातील सुरेश वाघमारे यांनी वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना संधी नाकारली आणि देवळी हा पक्षाकडे असलेला मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. दरम्यान बावनकुळे आणि सुरेश वाघमारे यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र चरण वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
खदखदणारी ही नाराजी समाजमाध्यमाच्या माध्यमातून आता हळूहळू प्रगट होऊ लागली आहे. याचा पक्षाला फटका बसू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपचे बावनकुळे यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध करून ते पक्षावर नाराज नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांची पूर्व विदर्भाचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली. भाजपकडे सध्या वर्धेचे खासदार रामदास तडस आणि नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे आदी तेली समाजाचे नेते या भागात आहेत. या दोन नेत्यांवर समाजाची नाराजी दूर करण्याचा भार आहे.काँग्रेसने वर्धेतून शेखर शेंडे, पूर्व नागपूरमधून पुरुषोत्तम हजारे, राष्ट्रवादीने राजू कारेमोरे यांना तूमसरमधून उमेदवारी दिली आहे.
इतर काही बातम्या-
दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार
वाचा सविस्तर – https://t.co/iq8dLaX8xZ@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4India #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
राज्यावर कर्जाचा डोंगर; युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर
वाचा सविस्तर – https://t.co/RsIygvvLBu@BJP4Maharashtra @BJP4India @ShivSena @Dev_Fadnavis @OfficeofUT #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
वाचा सविस्तर –https://t.co/oxu7OaZdJn@shetkari712 @Shetkari_S #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019 #Farmers
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019