सोनिया गांधींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन, ‘या’ पदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहु शकले नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आला आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि महाराष्र्टाचे … Read more

तूम्ही “सीएम मटेरियल” आहात त्यामुळे राज्यमंत्र्यांसारखे वागू नका ; मुनगंटीवारांची एकनाथ शिंदेंना कोपरखळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकनाथ शिंदे साहेब ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’ असं विधान मुनगंटीवार यांनी करताच आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असं थेट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता सभागृहातच म्हटलं आहे.यामुळे आता खांदेपालट होऊ शकतो का ? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. यवतमाळ … Read more

आम्हाला आमचं वास्तव माहित आहे, राष्ट्रवादी स्वप्नरंजनात नाही – जयंत पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सां

पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि  इतर- 58 असे  एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर

‘प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू’ असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी दिला. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बन्सोडे यांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी प्रशासनाला दमदाटी करत क्षीरसागर यांनी स्फोटक वक्तव्य केलं.

चंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड मधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला वाळव्यात मोठा धक्का 

राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे पुत्र सतेज पाटील, उरूण विकास सोसायटीचे संचालक शिवाजी पाटील, माजी नगरसेवक फारूख इबुशे, मुनीर इबुशे यांच्यासह उरूण परिसरातील पाटील, जाधव, मोरे, कोरे भावकीतील प्रमुखांनी इस्लामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला.

पुर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत – प्रकाश आंबेडकर

पूर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोरटे होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत. आघाडीतील पक्ष हाती लागेल ते घेऊन जायचे, आताचे सत्ताधारी संघटीतपणे भ्रष्टाचार करतात’ अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकार केली. आज पाथरी व परभणी येथील वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.