भारताला मोठा दिलासा ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू भारताविरुद्ध खेळणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पण हि मालिका सुरु होण्याअगोदर इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर या सिरीजमधून बाहेर पडला आहे. भारताच्या दौऱ्यावर असताना जोफ्रा आर्चरला दुखपत झाली होती. यामुळे तो काही दिवस मैदानाबाहेर होता. काही काळ आराम केल्यानंतर तो काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसला. पण तिकडेदेखील त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याला मैदानावर परतण्यास खूप वेळ लागू शकतो.

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून याअगोदर बाहेर पडला आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना त्याला हि दुखापत झाली. जोफ्रा आर्चरला ब्लॅक कॅप्स ही दुखापत झाली आहे. त्याला गोलंदाजी करताना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला भारताविरुद्ध आणि यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते.

जोफ्रा आर्चरवर मार्च महिन्यातसुद्धा एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. घरी असलेल्या फिस टॅकची सफाई करत असताना त्याला हि दुखापत झाली होती. तेव्हा शस्त्रक्रिया करून त्याच्या हातातून काचेचा तुकडा काढण्यात आला. या दौऱ्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यामुळे इंग्लडला जोफ्रा आर्चरची कमतरता भासू शकते. जोफ्रा आर्चरने आतापर्यंत १३ कसोटीत ४२ विकेट घेतल्या आहेत. तर ७ वनडे ३० आणि १२ टी-२० मध्ये १४ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Comment