नवी दिल्ली । रिअल इस्टेट कंपनी युनिटेक ग्रुप (Unitech Group) विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ईडी (Enforcement Directorate) ने 197 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. शनिवारी एजन्सीने याबाबत माहिती दिली.
10 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या
प्रीवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत सिक्किम (गंगटोक) आणि केरळ (अलाप्पुझा) मधील प्रत्येकी एक-एक रिसॉर्ट समवेत एकूण 10 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या गेल्या आहेत.
ईडीने म्हटले आहे की, “या स्थावर मालमत्तांचे मूल्य 197.34 कोटी रुपये आहे आणि कार्नोस्टी ग्रुपच्या विविध कंपन्या या मालमत्तांचे मालक आहेत.” ईडीने एका निवेदनात दावा केला आहे की, “युनिटेक ग्रुपने गुन्ह्याद्वारे 325 कोटी रुपयांचे अधिग्रहण केले आणि त्या बदल्यात कार्नॉस्टी ग्रुपमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. कार्नोस्टी ग्रुपने या पैशाने अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्या. ”
सायप्रस आणि केमन बेटांवर बेकायदेशीरपणे 2 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे पाठविल्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी एजन्सीने युनिटेक ग्रुपची 152.48 कोटींची संपत्ती जप्त केली. युनिटेक ग्रुप आणि त्याच्या प्रमोटर्सवर PMLA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. युनिटेकचे मालक संजय चंद्र आणि अजय चंद्र यांनी बेकायदेशीरपणे सायप्रस आणि केमन बेटांवर 2 हजार कोटी रुपये पाठविल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील तपासाचा भाग म्हणून अलीकडेच एजन्सीने दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील 35 जागांवर छापा टाकला. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अनेक एफआयआरचा अभ्यास करून कंपनी आणि प्रमोटर्सवर PMLA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा