1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Money Laundering : क्रिप्टोकरन्सी आणि त्याचे ट्रेडिंग करणाऱ्या एक्सचेंजेसबाबत दररोज काही ना काही ऐकायला मिळत असते. आताही एक अशी माहिती समोर आली आहे की, 1 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगमध्ये (Money Laundering) गुंतल्याची शक्यता असल्याने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) 10 क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजची चौकशी केली जात आहे.

What Is Cryptocurrency? | Bankrate

इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या 10 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवर चीनमधील काही इन्स्टंट लोन कंपन्यांमार्फत व्हर्चुअल क्रिप्टो मालमतेची खरेदी आणि ट्रान्सफर केल्याचा आरोप केला गेला आहे. Money Laundering

Cryptocurrency: Which crypto is most likely to survive the price crash? |  Marca

आंतरराष्ट्रीय वॉलेटवर क्रिप्टो कॉईन्स पाठवण्यात आले

या रिपोर्ट्सनुसार, तपासात असे समोर आले आहे की, आरोपी कंपन्या 100 कोटींहून जास्त किंमतीचे क्रिप्टो कॉईन्स खरेदी करण्यासाठी एक्सचेंजशी संपर्क साधत होत्या. हे क्रिप्टो कॉईन्स आंतरराष्ट्रीय वॉलेटमध्ये पाठवली गेले होते. Money Laundering

या रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेले आहे की,” एक्सचेंजेसकडून कोणताही आवश्यक तपास केला गेला नाही. तसेच संशयास्पद ट्रान्सझॅक्शन रिपोर्ट (STR) देखील सादर केला गेला नाही.” हे रिपोर्ट्स असे सुचवतात की, फेडरल एजन्सी पुढील आठवड्यात पुन्हा तपासाधीन क्रिप्टो एक्सचेंजच्या अधिकार्‍यांची चौकशी करू शकते. Money Laundering

Ed Raids Crypto Exchange Wazirx Director, Freezes Rs 64.7-Cr Bank Assets

WazirX चीही केली जात आहे चौकशी

गेल्या आठवड्यात, एजन्सीने सांगितले की, त्यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज WazirX विरुद्ध मनी लाँडरिंग (Money Laundering) चौकशीचा भाग म्हणून 64.67 कोटी रुपयांच्या बँक डिपॉझिट्स गोठवल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, एजन्सीने 3 ऑगस्ट रोजी हैदराबादमधील Zanmai Lab Pvt. Ltd.च्या संचालकावर छापे टाकले आहेत. त्याला ‘असहकार’ असल्याचे सांगितले जाते. एजन्सीने WazirX वर गेल्या वर्षी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://wazirx.com/

हे पण वाचा :

Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ ऑटो कंपनीच्या शेअर्सने दिला 41,900 टक्के रिटर्न !!!

Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

EPFO: जर नियोक्ता तुमच्या PF खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करावे ???

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!

Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा