कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून उद्या पाणी सोडणार : नदीकाठी सावधानतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 85.21 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 55 हजार 477 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 रोजी 8000 क्युसेस पाणी मुख्य दरवाजातून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

आज दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्या. 5:00 वाजता धरणाची पाणी पातळी 2147 फूट 00 इंच झाली असून धरणामध्ये 85.21 TMC (80.97%) पाणीसाठा झाला आहे. मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.75 TMC इतकी वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.