ख्यातनाम बिल्डर अविनाश भोसलेंच्या ऑफिसवर ED चा छापा

पुणे । पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी 8:30 वाजताच ईडीचं पथक भोसले यांचं पुण्यातील ABIL हाऊस  या कार्यालयात दाखल झालं. सकाळपासून EDचे अधिकारी ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. ABIL हाउसबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे.

फेमाकायद्याअंतर्गत येणाऱ्या विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अविनाश भोसले यांचीईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती.

FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like