हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. महिन्याभरा नंतर पुन्हा एकदा ईडी ने देशमुखांच्या घरी छापा टाकला.
अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी देखील झाली होती.
आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे.
केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा वापर – राऊत
केंद्र सरकार कडून ईडी आणी सीबीआयचा राजकीय वापर करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील तपास यंत्रणा तपास करण्यास सक्षम आहेत असेही राऊत म्हणाले.