औरंगाबाद – माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ईडीने (सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. ईडीने केलेल्या या छापेमारीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली. छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते अशी माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केले होते. जालन्यातील रामनगर साखर कारखान्यांच्या व्यहारांमध्ये, औरंगाबादमधील ज्या व्यवसायिकांवर छापेमारी झाली त्या उद्योजकांशी खोतकरांचे अर्थिक संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.