व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ED मध्ये शिपाई पदासाठी भरती; 81 हजारांपर्यंत पगार; इथे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्ये शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 104 जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

संस्था – अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement)
एकूण पदसंख्या – 104

भरले जाणारे पद –
वरिष्ठ शिपाई
शिपाई

वय मर्यादा – 56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
मिळणारे वेतन –

वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा
शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

जाहिरात (वरिष्ठ शिपाई) –  PDF
जाहिरात (शिपाई) – PDF 

अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in