हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आधीच याप्रकरणी संजय राऊत याना अटक झाली असून आता वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आल्याने राऊत कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
वर्षा राऊत याना अनोळखी व्यक्तीने १ कोटी १७ लाख रुपये पाठवले आहेत. असा दावा ईडीने कोर्टात केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ईडीला वर्षा यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्याच हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ED summons Sanjay Raut's wife Varsha Raut in the Patra Chawl land case money laundering case. Summons issued after transactions done on Varsha Raut's account came to light: ED pic.twitter.com/8cUyE7Bcao
— ANI (@ANI) August 4, 2022
दरम्यान, पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. प्रवीण राऊत यांच्याकडून जे पैसे मिळाले त्यातुन संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमीन खरेदी केली असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.