हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Edible Oil : सध्या देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. ज्यामुळे बाजारात अलीकडे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किंमतींत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. या आयातीमुळे बाजारपेठेत तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र तेलाच्या या घसरणीमुळे दूध, अंडी आणि चिकन यांसारख्या पोल्ट्री उत्पादनांवर परिणाम होऊन त्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे जाणून घ्या कि, भारत आपल्या गरजेच्या एकूण 60 टक्के खाद्यतेलाची आयात करतो. मात्र यावेळी सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र तेलाच्या सततच्या आयातीमुळे देशांतर्गत पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
सूर्यफूल तेलाचा भाव 100 रुपयांवर
बाजारातील सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोटा सिस्टीम अंतर्गत खाद्यतेलांच्या इंपोर्ट फ्री आयातीसाठी अनेक ऑर्डर दिल्या गेल्या आहेत. ज्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिलिटर 100 रुपयांची (प्रक्रिया केल्यानंतर घाऊक किंमत) घट झाली. ज्यामुळे 6 महिन्यांपूर्वी 200 रुपये प्रतिलिटर दर असलेले सूर्यफूल तेल गेल्या दोन-चार दिवसांत 100 रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे. Edible Oil
दूध-अंडी-चिकनचे भाव वाढण्याची शक्यता
बाजारातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तेलाचे भाव कमी झाले की खलाचे दर महागतात. कारण तेलाचे नुकसान भरून काढण्यासाठी तेलाचे व्यापारी त्याच्या किंमती वाढवून त्याची भरपाई करतात. त्याचप्रमाणे खल, डिओइल्ड केक (डीओसी) महागल्याने पशुखाद्य देखील महागतील. ज्याचा परिणाम दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच अंडी, चिकन यांसारख्या पोल्ट्री पदार्थांच्या किमतींवरही होणार आहे. Edible Oil
किरकोळ तेलाचे भाव महागले
आता सरकारने इंपोर्ट फ्री तेलाची आयात बंद करावी, असे बाजारातील सूत्रांनी म्हंटले आहे. कारण जेव्हा ही सिस्टीम लागू झाली तेव्हा बाजारात खाद्यतेलाचे भाव कोसळत होते. मात्र तेल कंपन्यांच्या MRP च्या मनमानी निर्णयाचा किरकोळ बाजारावर परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागड्या दरात तेल मिळत राहिले. मात्र जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास निम्म्या झाल्या असल्या तरी भारताच्या किरकोळ बाजारातील तेलाच्या किंमती वाढलेल्याच होत्या. Edible Oil
मोहरीच्या तेलाच्या दरात 50 रुपयांची घट
गेल्या आठवड्याभरात मोहरी पक्का घाणा आणि कच्या घाणाच्या तेलाच्या दरात 50 -50 रुपयांनी घट झाली आहे. ते अनुक्रमे 2,075-2,105 रुपये आणि 2,035-2,160 रुपये प्रति टिन (15 किलो) पर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय सोयाबीन तेलाचा भाव 11,100 ते 12,900 रुपये प्रतिक्विंटल, शेंगदाणा तेलाचा भाव 15,500 रुपये प्रति क्विंटल तर शेंगदाणा सॉल्व्हेंट रिफाइंडचा भाव 45 रुपयांनी घसरून 2,445-2,710 रुपये प्रति टिन झाला आहे. Edible Oil
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.commoditiescontrol.com/commodity-market/vegoil.html
हे पण वाचा :
Indusind Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
PF Balance : आपल्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत ??? ‘या’ 4 प्रकारे तपासा
Senior Citizen FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार 8% रिटर्न, ‘या’ बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Wheat and Floor Prices : गहू अन् पिठाचे भाव लवकरच कमी होणार??? याबाबत अन्न सचिव म्हणाले कि…
Budget 2023: 35 हायड्रोजन ट्रेन की 500 वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पातून रेल्वेला काय अपेक्षा आहेत