‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकींच्या निकालापासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि मागील काही वर्षांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे या दोघांच्या मनातील खदखद गोपीनाथ गडावरील मेळाव्यात बाहेर पडली. या मेळाव्यात बोलताना खडसे मुंडेंनी जाहीर व्यासपीठावर पक्ष नेतृत्वाबद्दलची नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता भाजप कडून मुंडे खडसेंवर निशाणा साधण्यात येत आहे. पक्ष विरोधी कारवाई करणारांची गय केली जाणार नाही हे प्रदेशाध्यक्षांचं विधान खडसे आणि मुंडे साठी एक सूचक इशारा असल्याचे बोलले जात आहे.
तसेच एका मराठी वृत्तपत्राच्या संपादकीय लेखातून देखील गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? वस्तुस्थिती ही आहे की, या दोघांनाही विस्थापित करणारे जे नेतृत्व उभे झाले आहे तेही बहुजन समाजाचेच आहे, हे यांच्या लक्षातच येत नाही. काळ वेगाने बदलत आहे. मतदारांची मानसिकता, आशा-अपेक्षा खूप बदलत चालल्या आहेत. याची जाण या दोघांनाही नाही, असेच दिसून येते. काळाची ही बदलती पावले यांनी ओळखली नाही, म्हणून त्यांची ही अशी अवस्था झाली आहे, अस या लेखात म्हटले आहे.