हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. मात्र आता पालक संघटना कडून शाळा सुरू करण्याची मागणी होत पासूनण त्याच पार्श्वभूमीवर सोमवार पासून शाळा सुरू करण्याचा विभाग शिक्षण विभाग करत आहे. त्यासंदर्भात पत्र विभागाने मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. जे बाधित होत आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची जास्त गरज भासत नाही. या पृष्ठभूमीवर शाळा समित्या आणि पालक वर्गाकडून शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून, तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.
पहिली ते बारावीच्या तुकड्यांचा यात समावेश असेल. तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीच परिस्थिती पाहून घ्यावा, असेही प्रस्तावात नमूद असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या एसओपी आधी ठरविल्या आहेत, त्या कायम राहणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.