ठरलं! या तारखेपर्यंत लागणार दहावी- बारावीचा निकाल

मुंबई । कोरोना संकटामुळं रखडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली. निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु … Read more

१६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संयम असावा लागतो म्हणतात ते काही खोटे नाही. वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब होय. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व १२ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखतीनंतर ते आता नायब तहसीलदार झाले आहेत. अनेकदा अपयश पचवून देखील त्यांनी धीर सोडला … Read more

राज्य शासनाने विविध विषयांच्या सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई । ‘सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या … Read more

मटका व्यवसायात वडीलांचा मृत्यू; मुलगा जिद्दीने MPSC तून अधिकारी बनला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत … Read more

नागपूरची अंतरा बनली महाराष्ट्रातील पहिला महिला फायटर पायलट

नागपूर । नुकताच इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नागपूर येथील अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. तर देशातील त्या दहाव्या महिला पायलट आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा यांनी … Read more

सरकारने विद्यार्थ्यांना मोफत टॅब द्यावेत; महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

मुंबई । गेवराई तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोफत टॅब उल्पब्ध करून देण्याबाबत, महाराष्ट्र पदवीधर संघटनेने पुढाकार घेत शासनाला विनंती केली होती. या पत्राची शासनाने त्वरित दखल घेतली आहे. कोरोना पार्श्वभूमीमुळे राज्यात प्रत्यक्ष शाळा महाविद्यालये सुरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यात … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम परीक्षाही ऐच्छिक – उदय सामंत

मुंबई । विद्यापीठांच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. तर बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरु आणि अधिकारी यांची सरकारस्तरावर बैठक घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी … Read more

कंपनीतील नोकरी सोडून स्पर्धापरीक्षेची तयारी केली आणि आज उपजिल्हाधिकारी झाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय; राज्यमंत्री तनपुरेंनी दिली माहिती

मुंबई | महाविकास आघाडीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांच्या परिक्षा घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!अंतिम वर्ष परीक्षांबाबत … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more